पुरंदरच्या तहसीलदारांचा कोरणा रिपोर्ट निगेटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्याच्या सासवड येथील तहसील कचेरीतील एका कर्मचार्याचा कोरोना रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला होता. संबंधित व्यक्ती तहसीलदार, नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांच्या सतत संपर्कात होता. त्यामुळे या सर्वांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये तहसीलदार रूपाली सरनोबत यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे; अशी माहिती खुद्द तहसीलदार यांनी दिली.
'माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. कालपासून थोडी चिंता होती पण आपण सर्वांनी विचारपूस केल्याने आधार मिळाला होता. आपण आस्थापुर्वक चौकशी केली त्याबद्दल धन्यवाद' असे त्यांनी पुरंदरच्या नागरिकांना संबोधले आहे.
यापूर्वीही पुरंदरमधील कोरोनाचा रिपोर्ट आल्यानंतर कोणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संसर्ग टाळणे मध्ये पुरंदरची प्रशासन कायमच यशस्वी झाले आहे. त्याच प्रकारे तहसीलदार यांचा शासकीय गाडीचा चालका कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तो तहसीलदार यांच्या संपर्कात मागील काळात आला होता. पण त्यांचा अहवाल आज निगेटिव्ह आल्याने पुरंदरच्या तहसील प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी श्वास सोडला आहे. यापुढेही पुरंदरचे प्रशासन सतरक्ता घेत आहे. नागरिकांनीही सावधानता बाळगावी विनाकारण घराबाहेर पडू नये. पडल्यास तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर सतत करावा, हात स्वच्छ धुवावेत, दोन व्यक्तींमधील अंतर दोन मीटर असावे. तसेच मुंबई-पुण्याहून येणाऱ्या लोकांपासून सावध राहावे त्यांना त्यांचे नियम व्यवस्थित सांगावे व आपले गाव कोरणामुक्त कसे राहील यासाठी प्रयत्न करावे व प्रशासनाचे आदेश तंतोतंत पाळून कोरोना मुक्तीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे; आव्हान पुरंदरच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
COMMENTS