सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

प्रशासनाचे आदेश व सूचना प्राप्त होईपर्यंत जेजुरी खंडोबा मंदिर देवदर्शनासाठी बंदच राहणार..

प्रशासनाचे आदेश व सूचना प्राप्त होईपर्यंत जेजुरी खंडोबा मंदिर देवदर्शनासाठी बंदच राहणार...
मार्तंड देवसंस्थान समितीचा खुलासा

पुरंदर : प्रतिनिधी
       अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर भाविकांना देवदर्शनासाठी १८मार्च २०२०पासून बंद आहे. पुढील काळात देवदर्शनासाठी मंदिर खुले करताना भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना बाबत जोपर्यंत प्रशासनाकडून आदेश, सूचना, मार्गदर्शन प्राप्त होत नाही तोपर्यंत भाविकांना देवदर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार नाही. मात्र श्रींचे नित्याचे धार्मिक विधी सुरू आहेत, ते तसेच सुरू राहणार आहेत .असा खुलासा मार्तंड देवसंस्थान समितीने केला आहे.    
          कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवांचा काळ म्हणजे मार्च ते जून असा असून लग्नसराईचे दिवस, शालेय सुट्ट्यांच्या हंगाम, चैत्र पौर्णिमा, सोमवती यात्रा, या कालावधीत किमान ५० लाखांहून अधिक भाविक जेजुरीत दाखल होऊन कुलधर्म -कुलाचार करीत देवदर्शन घेतात .मात्र यंदाच्या वर्षी महामारीच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  झालेल्या "लॉकडाऊन"मुळे राज्यातील कोणीही भाविक जेजुरीत फिरकला नाही. दैनंदिन धार्मिक विधी वगळता देवांचे जत्रा यात्रा उत्सव साजरे करण्यात आले नाहीत.एवढेच नव्हे तर ग्रामस्थानाही देवदर्शन बंदच आहे. 
इतर राज्यातील मंदिरे देवदर्शनासाठी खुली करण्यात येत असल्याने व सध्या राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना, जेजुरीच्या कुलदैवत खंडेरायाचे मंदिर भाविकांना देवदर्शनासाठी खुले होणार का? असा प्रश्न राज्यातील भाविकांना पडला असून भ्रमणध्वनीवरून  देवसंस्थान व्यवस्थापणाकडे तशी चौकशी होत आहे. त्या अनुषंगाने देवसंस्थान समितीकडून खुलासा करण्यात आला आहे.

एकत्रितरित्या बैठक घेणार ,,,,
खंडेरायाचे मंदिराबाबत प्रशासनाचे आदेश व सूचना प्राप्त झाल्यानंतर महसूल ,(तहसीलदार पुरंदर) आरोग्य, नगरपालिका, पोलीस प्रशासनासह पुजारी-सेवेकरी व ग्रामस्थ मंडळाची एकत्रित बैठक घेण्यात येणार असून प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आदेश, सूचना आणि मार्गदर्शन यांची माहिती व त्याची काटेकोर अंमलबजावणी बाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच देवदर्शनासाठी मंदिर खुले करताना भाविकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना, जंतूनाशक फवारणी, सेनेटायझर, स्वच्छता, भविकांमधील सुरक्षित अंतर, आदी खबरदारीच्या करावयाच्या उपाययोजनाबाबत देवसंस्थान व्यवस्थापन सज्ज करण्यात येत असल्याची माहिती  देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6983,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : प्रशासनाचे आदेश व सूचना प्राप्त होईपर्यंत जेजुरी खंडोबा मंदिर देवदर्शनासाठी बंदच राहणार..
प्रशासनाचे आदेश व सूचना प्राप्त होईपर्यंत जेजुरी खंडोबा मंदिर देवदर्शनासाठी बंदच राहणार..
https://lh3.googleusercontent.com/-Y726pYGly9g/Xt-pKHJ8snI/AAAAAAAACMc/yrU5dKJ77qkHRn8nwf1y9rnbYYSC0_kYwCLcBGAsYHQ/s1600/1591716136163090-0.png
https://lh3.googleusercontent.com/-Y726pYGly9g/Xt-pKHJ8snI/AAAAAAAACMc/yrU5dKJ77qkHRn8nwf1y9rnbYYSC0_kYwCLcBGAsYHQ/s72-c/1591716136163090-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_99.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_99.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy