पुरंदर तालुक्यातील आजची पूर्ण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या किती आहे वाचा सविस्तर
पुरंदर: प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड मधील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही. मागील आठवड्यात दररोज एक एकने होणारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मागील दोन दिवसात तीन, चार, सहा अशा पद्धतीने वाढत आहे. आज बुधवार दि.१ जुलै रोजी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले असून आजची संख्या ४८ वर असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. दोन व्यक्ती पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत तर एक नव्याने पॉझिटिव्ह झाला आहे.
सासवड येथील तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. दोन व्यक्ती पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत (high risk), एक व्यक्ती नवीन आहे. सासवड मधील वाढती कोरोना रुग्ण संख्या हे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान आहे. वाढती रुग्ण संख्या कमी करण्याची प्रशासन व नगरपरिषद आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र स्थानिक लोकांचा याला हवा तितका प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही.
सासवड मधील अत्यावश्यक सेवेच्या दुकानांमध्ये तेल, साबण, डिर्जंट पावडर व इतर अनावश्यक वस्तू विक्रीस ठेवल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसाच्या जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक वस्तू असलेल्या काही दुकानांमध्ये नको त्या वस्तूही दिसून आले आहेत. यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे की कोरोनाची वाढती रुग्ण संख्या कशी कमी करायची. शासनाकडून संपूर्ण लॉकडाउन ठेवण्याचे निर्देश नाहीत, त्यामुळे अंशतः किंवा कंटेनमेंट झोन यापुरताच ठेवता येतो. प्रशासनाकडून लोकांना सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, सॉनिटायझरचा मुबलक वापर आदी खबरदारी घेण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे. मात्र लोक गर्दी करत आहेत. तरीही अजूनही वेळ गेलेली नाही कृपया लोकांनी सतर्कता बाळगत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, लवकरच सासवड शहर करोना मुक्त होण्यास मदत होईल असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
COMMENTS