पहिल्या श्रावणी सोमवारी कळस दर्शनासाठी गर्दी : सोमेश्वर देवस्थान आणि पोलिसांची दमछाक
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शन बंद ठेवले असले तरी भाविक कळस दर्शनासाठी येत असल्याने मंदिर प्रशासन आणि पोलिसांची दमछाक होत आहे. असे असले तरी देवस्थान कमिटी आणि वडगाव निंबाळकर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात १० ते १२ लाख भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात, मात्र यावर्षी मंदिर बंदच असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट होता, मात्र काही भाविक कळस दर्शनासाठी येत असल्याने मंदिर प्रशासन आणि पोलिसांची दमछाक होताना दिसली. दुसरीकडे यावर्षी भाविकाच नसल्याने आणि बाजारपेठा ओस पडल्याने महिन्याभरातील एक कोटींच्या आसपास आर्थिक व्यवसा मंदावली आहे. श्रावण महिन्यात राज्यभरातून भाविक सोमेश्वर दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिन्यात भाविकांकडून येणाऱ्या देणगीवर मंदिराचे वर्षभराच्या गरजा भागात असतात. असे देवस्थान चे अध्यक्ष विनोद भांडवलकर आणि सचिव सुनील भांडवलकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पंचायत समिती सदस्य, प्रांताधिकारी, तहसीलदार या सर्वांचे मंदिराला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभत असते. देवस्थान अध्यक्ष विनोद भांडवलकर, सचिव सुनील भांडवलकर, विश्वस्त adv. गणेश आळंदीकर, डॉ कुलदीप काकडे तसेच सर्व विश्वस्त यांचे नेहमीच बारकाईने लक्ष असते.
COMMENTS