पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजही शनिवार दि.३ जुलै सकाळी सासवड येथील ८ व ग्रामिण भागातील ३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात सासवड व ग्रामीण भागातील एकूण ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. पुरंदर तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ९८ झाली आहे.
पुरंदर तालुक्यात दुपार पर्यंत एकूण ११ रुग्णांचे अहवाल positive आलेले आहेत. त्यापैकी ३ रुग्ण ग्रामीण, ८ रुग्ण सासवड नगरपालिका हद्दीतील आहेत. ग्रामीण भागातील ३ पैकी एक नवीन रुग्ण, २ पूर्वीच्या रुग्णांच्या हायरिस्क कॉंटेक मधिल आहेत. सासवड नगरपालिका हद्दीतील ८ रुग्णांपैकी ५ नवीन रुग्ण, ३ पूर्वीच्या रुग्णांचे हायरिस्क कॉंटेक मधिल आहेत. ग्रामीण भागातील सोनोरी व कुंभावळण या गावातील ३ व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
सासवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. काही केल्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने किंवा आटोक्यात येत नसल्याने सासवड शहरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. काही लोकांचे म्हणे येत आहे की, सासवड शहर काही दिवसांकरता संपूर्ण लॉकडाऊन करावे. ज्या पद्धतीने शेजारच्या तालुक्यातील भोर शहर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने सासवड शहर ही संपूर्ण लॉकडान करणे गरजेचे वाटत आहे. मात्र प्रशासन तातडीने असे निर्णय घेत नाही कारण राज्य सरकारचे तसे निर्देश नसल्याचे पुरंदरच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
COMMENTS