पुरंदरच्या ग्रामिण व सासवडच्या हद्दीत आज कोठे आढळले रुग्ण : वाचा सविस्तर
पुरंदर : प्रतिनिधी
शुक्रवारी पुरंदर तालुक्यातील सासवड सह तीन खेडे गावातील ११ लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ससवडचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शंभरी कडे वाटचाल दिसत आहे. तरीही सासवड शहर संपूर्ण लॉकडाऊन का केला जात नाही असा सवाल सामान्य जनता विचारु लागली आहे.
सासवड मधील जय महाराष्ट्र चौक येथील २, संगमेश्वर हौसिंग सोसायटी येथील १, सोपान नगर हद्दवाढ येथील १, खंडोबा माळ येथील १, पालखीतळ रोड मा.राज्यमंत्री निवासस्थानासमोर १, मिरजकर दवाखान्या मागे १ आणि सासवडच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा हॉटस्पॉट असलेल्या लांडगे आळीतील १ रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सासवड शहर कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे पेशंट आढळून येत आहेत. आज सकाळी धनकवडी, कुंभारवळण व सोनोरी येथील प्रत्येकी १ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
सासवड शहर करोनाचे हॉटस्पॉट होत असताना शहरात जनजीवन सुरळी पणे सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दुकाने सुरू आहेत. लोकांची गर्दी तुरळक असली तरी लोक अत्यावश्यक वस्तू किंवा गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये जातच आहेत. मात्र हे धोकेदायक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे. पुरंदरच्या शेजारीच असलेल्या भोर तालुक्यातील भोर शहरात काही रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे दिसून येताच भोर शहर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सासवडमध्ये तसा निर्णय का घेतला जात नाही? असे सर्वसामान्य जनतेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारू जाऊ लागले आहेत.
COMMENTS