मुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम या गावातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमेश्वरनगर परिसरात पहिलाच कोरोना पेशेंट सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सदरील व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने तो स्वतः होऊन काल दि २ रोजी पुणे येथे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. आज सकाळी त्याची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या चार महिन्यापासून सोमेश्वरनगर पारिसरातील नागरिकांनी काळजी घेतल्यामुळे या भागात एक ही कोरोना पेशेंट नव्हता, मात्र हा पाहिलाच कोरोना पेशेंट सापडल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
COMMENTS