लॉकडाऊन मधिल वीजबिल माफ करा - स्वप्निल कांबळे
नीरा : प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात लोकांना काम- धंदे नव्हते. गोरगरिबांची मजुरी बुडली, दोन वेळच्या जेवणाचे वांदे झाले; असे असताना लोकांना भरमसाठ लाईट बिल आल्याने लोक संतप्त झाले आहेत. हे लाईट बिल वास्तविक माफ होणे गरजेचे होते. मात्र माफ होणे तर दूरच पण आवकी सवा लाईट बिल आल्याने लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या आदेशानुसार आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. असे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका युवाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी इशारा दिला.
कोविड१९ कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान मांडलेल आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व राज्य सरकार यांनी संयुक्तरित्या लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामूळे सर्व छोटे मोठे व्यवसायिक, सरकारी व निमसरकारी कार्यालये बंद होती. लोकांचा रोजगार बंद होता. या कालखंडात गरिब सर्व सामान्यांच्या हाता तोंडाची लढाई सुरु आहे. अशावेळी जर हाताला कामच नसेल तर वीजबिल कुठून भरणार? त्यामूळे सरकारने लॉकडाऊन कालावधीतील विज बिल माफ करावे अन्यथा संपुर्ण राज्यभर पक्षाच्या वतीने अंदोलन केले जाईल. असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. असे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुकायुवाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी इशारा दिला.
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीच्या नीरा सब स्टेशनचे उप अभियंता बाळासाहेब फासगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अल्पसंख्यांक अध्यक्ष अन्वर शेख, नीरा व्यापारी असोसिएशनचे सदस्य राजकुमार शहा, नीरा शहर युवक अध्यक्ष दिपक जाधव, सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे, विजय सपकाळ, भूषण रेड्डी, वसंत नामदास, विशाल कड, समीर पठाण, साहेब शेवाळे आदि उपस्थित होते.
'लॉकडाऊनच्या काळात विज बिल संदर्भात ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची निरसन पुढील काळात केले जाईल. यासंदर्भात ग्राहक मेळावा ही आयोजित करण्याचे मानस विद्युत कंपनीचा आहे. तरीही कोणाची काही शंका असल्यास त्यांनी विद्युत कंपनीच्या कार्यालयामध्ये येऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. अधिकारी आपल्याला समर्पक उत्तरे देतील व नियमाप्रमाणे बिल कसे आले आहे हे समजून सांगतील. तरीही लोकांनी निश्चितपणे आपल्या वाढीव बिलाची खात्री करून घ्यावी.'
बाळासाहेब फासगे
उपअभियंता म. रा.वि. वि. कं. शाखा नीरा.
COMMENTS