बारामतीच्या पश्चिम भागातील बेंदूर, साथी आणि बैलपोळ्याचे सण रद्द
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील उद्या पासून साजरे करण्यात येणारे बेंदूर, साथी आणि बैलपोळा हे सण साजरे करण्यास मनाई करण्यात आली असून बैलाच्या मिरवणुका आणि एकत्र येत कोणतेही धार्मिक आणि सामाजिक सण एकत्र येत साजरे करू नये असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर वाणेवाडी आणि मुरूम या गावातील ग्रामस्थांनी बेंदूर सण आणि साथीचा सण रद्द केला आहे. याबाबत दोन्ही ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना एकत्र येत सण साजरे करू नये असे आवाहन केले आहे. उद्या बेंदूर सण साजरा होत आहे, शेतकऱ्यांना बैलांची मिरवणूक काढण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे, घरीच सण साजरे करावेत तसेच साथी हा सण देखील घरीच साजरा करावा असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस आणि ग्रामपंचायतीने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यातही हा निर्णय घेण्यात आला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्वच गावातील बेंदूर, साथी आणि बैलपोळा चे सण रद्द करण्यात आले आहेत.
COMMENTS