बेंदूर सणाला बैल रंगवून सामाजिक संदेश : वाणेवाडी येथील शेतकाऱ्याचा उपक्रम
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता बारामती येथील अमोल भोसले या शेतकऱ्यांने आज साजरा झालेल्या बेंदूर सणाला बैले रंगवून त्यातून सामाजिक संदेश दिला आहे.
आज सोमेश्वरनगर परिसरातील मुरूम, वाणेवाडी आणि वाघळवाडी या गावांतून बेंदूर साजरा करण्यात आला. मात्र गर्दी टाळण्यासाठी कोणतेही सामजिक आणि धार्मिक सण एकत्र येत साजरे करण्यास मनाई करण्यात आली असल्याने बैलांच्या मिरवणुकीवर बंदी असल्याने बळीराजाने यावर्षी घरीच बेंदूर साजरा केला.
वाणेवाडी येथील शेतकरी अमोल भोसले यांनी कोरोना या महामारीवर प्रतिबंधक उपाय करण्याच्या उद्देशाने बेंदूर सणाच्या निमित्ताने बैलांच्या अंगावरतीच अंतर पाळा कोरोना टाळा, मास्क वापरा, घरीच रहा सुरक्षित रहा अशा प्रकारचा संदेश दिला आहे.
ग्रामिण भारतातील अनेक प्रमुख सणांपैकी एक सण अशी बेंदूर सणाची ओळख आहे. हा सण शेतकीर आणि शेतीशी निगडीत असला तरी, प्रामुख्याने तो शेतकऱ्याचे सोबती असलेल्या बैल आणि इतर पशूंचा अधिक आहे. वर्षभर शेतात राब राब राबून बळीराजाची सेवा करणार्या व भारतीय कृषी संस्कृतीमध्ये महत्त्वाचा घटक मानल्या जाणार्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येणारा 'महाराष्ट्रीय बेंदूर सण' असतो
COMMENTS