सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदरचा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सासवडचा लॉकडाऊन कसा आहे : डॉ.उदयकुमार जगताप

पुरंदरचा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सासवडचा लॉकडाऊन कसा आहे : डॉ.उदयकुमार जगताप

पुरंदर : प्रतिनिधी

 वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्ये मुळे सासवड शहरामध्ये काल संध्याकाळपासून आठवडा भरासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात फक्त दवाखाने, मेडिकल, पॅथॉलॉजी लॅब दिवसभर तर  दूध विक्री दुकाने सकाळी सहा ते नऊ यावेळेत उघडे राहतील. असे लेखी पत्र सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी काढले आहे. मात्र आज शनिवारी सासवडमधील दारू विक्रीची दुकाने उघडी दिसल्याने काही सजग नागरिकांनी याविषयी सोशल मीडियातून आवाज उठवत याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या या भावना आपणासमोर घेऊन येत आहोत. 
'सासवड शहर बंद (दारू सोडून)' सासवड शहर आजपासून आठ दिवस नगरपालिकेने पूर्ण बंद केले आहे. काहीही व कोणतेही दुकान उघडे नाही. सर्व दुकाने ,भाजीपाला,बाजार सर्व बंद. सासवड मध्ये येणाऱ्या लोकांची माहिती नगरपालिकेत द्यायची. त्यांचे रेकॉर्ड ठेवायचे. मेडिकल, दवाखाने फक्त उघडे आहेत.अत्यावश्यक सेवेमध्ये दारूचा समावेश सासवड नगरपालिकेने केलेला आहे. त्यामुळे सर्व दारू दुकाने उघडी आहेत. दारू आणि दारूधंदे यांच्यावर नगरपालिकेचे प्रेम का? भाजीवाले, किराणा वाले दूधवाला, छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या लोकांना सासवड नगरपालिकेने दुकाने बंद  करायला लावली आहेत. नगरपालिकेचे असे म्हणणे असावे की, सर्वांनी दारू व्यवसाय सुरू करावा. म्हणजे या गावात जगता येईल. पोटापूरत मिळवता येईल.
         संत सोपानदेवांची पुण्य भूमी येथे गुप्त रुपात भागीरथी प्रगट झाली. ही शुरांची व वीरांची भूमी हे वाक्य कोणत्याही राजकीय व राजकीय पुढाऱ्याने घ्यावे ही नैतिकता आज संपली आहे.१०० पेंशट कोरोनाचे झाले आहेत. म्हणजे गुणिले १० याचा अर्थ १००० पेशंट आज ह्या स्थितीत असतात चाचण्या न झालेले पेशंट व लक्षणे नसलेले पेशंट हे उरलेले आहेत.
सासवडचे असे धार्मिक व ऐतिहासिक वर्णन कोणी सांगू नये.
           येथे मुक्तपणे" मदिरा" गावातून वाहत आहे.
सासवड गावबंदी हा सर्व शासकीय यंत्रणेत, लोकांमध्ये, चेष्टा व मस्करीचा विषय झाला आहे.
"ही अजब पूर्ण गावबंदी साऱ्या महाराष्ट्रात  गेल्या  दहाहाजार वर्षात झाली नाही व पुढेही होणार नाही ."
या गावात परमेश्वर अथवा सोपानदेव जरी प्रगटले तरी या जनतेस वाचवू शकत नाहीत . दारू व  दारुवाला यांचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाहीत. प्रशासन सुद्धा दारुवाल्यांसामोर लोटांगण घालते. दारू दुकानासमोर पोलीस बंदोबस्तात दारू विक्री सुरू आहे.
मी दारूबंदीसाठी मोर्चे काढले ,धरणे धरले, अर्ज केले नगरपालिकेलाही दारूबंदी करायला लावली ,
नवीन दुकानांना व परमिट रूमला परवानगी मिळणार नाही हे सर्व न्युज चॅनेल वर जाहीर नागरपालिकेस करावे लागले. वर्ष झाले लगेच सासवड हद्दीत नवे परमीट रुम चालू झाले. मी माहिती अधिकारात विचारले असता नगरपालिकेचे अधिकारी व सभागृह यावर मौन बाळगत गप्प बसले आहेत. जे लोक निष्पाप आहेत जे लोक नियम पाळतात त्यांना जे लोक नियम पाळत नाहीत त्यांच्या मुळे संसर्ग होणार आहे. दुःख या गोष्टीचे आहे. 
   डॉ. उदयकुमार जगताप
     सजग नागरिक


सोपान कान्हेकर : उत्पादन शुल्क अधिकारी पुरंद

 'जिल्हाधिकारी यांच्या आदेशा शिवाय सासवडमधील किंवा जिल्ह्यातील इतर ठिकाणांचे मध्ये विक्रीची दुकाने बंद करता येत नाहीत. ही दुकाने राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सुरू आहेत. जर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा वेगळा आदेश दिला तरच देशी-विदेशी मध्य विक्रीची दुकाने बंद राहतील अन्यथा ती नियमित वेळेत सुरू राहतील.'


COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7031,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदरचा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सासवडचा लॉकडाऊन कसा आहे : डॉ.उदयकुमार जगताप
पुरंदरचा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सासवडचा लॉकडाऊन कसा आहे : डॉ.उदयकुमार जगताप
https://lh3.googleusercontent.com/-W2h6Yl-Nz24/XwBiZmDK3dI/AAAAAAAAC5A/N0JYchFZ_6g11R9qSfYa2hoNXUvL4u4cwCLcBGAsYHQ/s1600/1593860708445806-0.png
https://lh3.googleusercontent.com/-W2h6Yl-Nz24/XwBiZmDK3dI/AAAAAAAAC5A/N0JYchFZ_6g11R9qSfYa2hoNXUvL4u4cwCLcBGAsYHQ/s72-c/1593860708445806-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_64.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_64.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy