पुरंदरच्या कोरोना रुग्णांची संख्या शंभरी पार :
सासवडच्या रुग्णांच्या संख्येत घट
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवडच्या कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. प्रशासनाने वेगवेगळे उपायोजना केले आहेत, तरीही आज शनिवारी दि.४ रोजी सकाळी आणखी दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर ग्रामीण भागातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता सासवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ७२ झाली आहे तर संपूर्ण तालुक्याची कोरोन रुग्णसंख्या १०१ संख्या झाली आहे.
आज पुरंदर तालुक्यात एकूण तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. एक ग्रामीण भागातील धनकवडी गावातील हायरिस्क कॉंन्टेक्ट मधिल आहे. तर दोन सासवड मधिल नवीन रुग्ण आहेत. अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
काल एकाच वेळी कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकी झाली व मागील दोन दिवसात त्याच प्रमाणे दोन अंकी रुग्णसंख्या होत होती, त्यामुळे सासवडकर नागरिकांनी कठोर निर्णय घेत नगरपरिषदेला संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे सुचविले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नगरपरिषदेवर लोकांनी टीका करत, संपूर्ण सासवड शहर लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू करावे असे वारंवार सांगितल्याने व सासवडमधील नगरसेवकांनीही ही तसाच सुर ओढल्याने मुख्याधिकारी विनोद जळक यांनी काल रात्री निर्णय घेत पुढील आठ दिवस म्हणजेच ११ जुलै पर्यंत सासवड शहर संपूर्ण लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे सासवडकर नागरिक खाजगी मध्ये सांगत आहेत. या निर्णयाचे स्वागतही सासवडकर नागरिकांनी केली आहे. मात्र पुढिल काळात अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडी असताना त्यामध्ये काही गैरप्रकार तर होत नाही ना हे ही प्रशासनाने व पोलिसांनी कटाक्ष पणे पाहणे गरजेचे आहे. पुढील काळात सासवड शहर कोरोना मुक्त होईल अशी लोकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. हा लॉकडाऊन संपल्यानंतर पॉझिटिव्ह कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये घट होऊन पुढील काळात सासवड शहरातील जनजीवन सुरळीत चालू होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
COMMENTS