मुरूम च्या उपसरपंचपदी राजेंद्र कदम
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम(ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र बबनराव कदम यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी उपसरपंच निलेश शिंदे यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांनी राजेंद्र कदम यांचे अभिनंदन केले. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे कदम यांनी निवडीनंतर सांगितले. यावेळी सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, सोमेश्वरचे संचालक नामदेवराव शिंगटे, माजी संचालक फत्तेसिंह जगताप, दूध संघाचे माजी अध्यक्ष अविनाश चव्हाण, दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, डॉ. मनोहर कदम, हरीशचंद्र जगताप, माजी सरपंच दिनकर कदम, प्रदीप कणसे, सर्व सदस्य, ग्रामसेवक प्रकाश सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS