पुरंदरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९५ वर : तर १४ मृत्यू
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड सह ग्रामीण भागांतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज दिवसभरात उच्चांकी झाली आहे. आज दिवसभरात दोन वेळा अहवाल आले. त्यापैकी पहिला अहवालात २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, तर दुसऱ्या अहवालतत २ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आले होते. आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या त्यमुळे २४ झाली. काल सोमवारी रात्री १ वृद्ध रुग्ण दगावल्याची माहिती आज मंगळवारी सकाळी तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९५ तर कोरोनाने १४ मृत्यू झाले आहेत.
पुरंदरच्या प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी कोरोना झाल्याने सासवड येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल असलेल्या ७० वर्षे वयाच्या पुरुषाचा काल रात्री उशिरा निधन झाले. संबंधित व्यक्ती सासवड शहरातील रहिवासी होते. दुपारी मिळालेल्या माहितीनुसार सासवड येथून पाठविण्यात आलेल्या १३१ स्वॅप पैकी ८९ चे अहवाल प्राप्त झाले. २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड येथील ६ रुग्ण, गराडे मठवाडी १३ रुग्ण, टेकवडी १ रुग्ण, सिंगापूर १ रुग्ण, तसेच पिसर्वे येथे १ रुगणाचा खाजगी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. एकूण २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार सासवड येथील आज मंगळवारी उर्वरित ४२ पैकी ४० रुग्णांच्या स्वॅपचे अहवाल प्राप्त झाले. त्या पैकी २ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड येथील १, तर आंबळे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.
COMMENTS