सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

......आणि 'ती' स्मशनात एकटीच जळत होती : नात्यांनी पण सोडली साथ : सोमेश्वरनगर परिसरातील एका गावातील घटना

......आणि 'ती' स्मशनात एकटीच जळत होती : नात्यांनी पण सोडली साथ : सोमेश्वरनगर परिसरातील एका गावातील घटना

सोमेश्वरनगर  : प्रतिनिधी

पोटच्या मुलाने वाऱ्यावर सोडलं  आणि सख्या भावाने तिरस्कार केला, शेवटी ती दोन दिवस उपाशी तापासी राहिली आणि ज्या मातीत आयुष्य काढलं शेवटी त्याच मातीत येऊन जीव सोडला ... हृदय पिळावून टाकणारी घटना सोमेश्वरनगर परिसरातील एका गावात घडली आहे.
          आज दुपारी त्या म्हतारीवर सामजिक कार्यकर्यांनी आणि लांबच्या नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. वयाच्या ७५ तर ८० वर्षात या म्हतारीने दुसऱ्याच्या शेतात काम करून स्वतःचा उदरनिर्वाह केला. शेवट पर्यंत एकटीच राहिली, रक्ताची नाती आयुष्यभर तिच्या कधी जवळपण आली नाहीत, आणि शेवटच्या क्षणाला देखील कोण बरोबर नव्हतं... पोटच्या मुलाने सख्या भावाने देखील शेवटच्या घटकेला साथ दिली नाही. 
          सोमेश्वरनगर परिसरातील एका गावातील एक ८० वर्षाची महिला आपल्या आयुष्यातल्या  शेवटच्या क्षणी मुंबई स्थायिक मुलाकडे हवा पालटासाठी गेली होती. आज अचानक तिचा मृतदेहच सापडला... आज सकाळी वाघळवाडी गावातील काही युवक निरा बारामती रोडवरील हॉटेल अक्षय गार्डन या ठिकाणी गेले असता त्यांना एक म्हतारी झोपल्याचे दिसले त्यांना काहीच हालचाल दिसली नसल्याने या युवकांनी पोलीस आणि स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुंबई स्थायिक असलेल्या मुलाला फोनवरून कल्पना दिली असता, लॉकडाउन मुळे मी येऊ शकत नाही अंत्यविधी उरका माझी काही हरकत नाही असे उत्तर मिळाले. ती म्हतारी अनेक महिने या गावात नसल्याने पटकन तिला कोणी ओळखलच नाही.... दोन दिवसापासून ही म्हतारी अक्षय गार्डन येथेच झोपत असल्याचे पाहणाऱ्यांना सांगितले, कदाचित अंगात त्राण नसावा अथवा तिला दोन दिवसांपासून अन्न मिळाले नसावे त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. मात्र ही म्हतारी मुंबईवरून आली आणि तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू नक्की कोरोनामुळे झाला की वृद्धापकाळाने हे समजत नव्हतं त्यामुळे तिच्या जवळ कोणी गेलं नाही. वडगाव निंबाळकर पोलीस  तसेच ग्रामपंचायत वाणेवाडी यांच्या तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि लांबच्या नातेवाईकांच्या पुढाकारातून या म्हतारीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
          लॉकडाउन मध्ये सर्वच वाहतूक यंत्रणा बंद असतानाही ही म्हतारी मुंबई वरून मुलाच्या घरून याठिकाणी आलीच कशी, असा प्रश्न सर्वांना पडला असताना काल एक चार चाकी गाडी या म्हतारीला या ठिकाणी सोडून परत गेल्याचे प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांनी सांगितले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : ......आणि 'ती' स्मशनात एकटीच जळत होती : नात्यांनी पण सोडली साथ : सोमेश्वरनगर परिसरातील एका गावातील घटना
......आणि 'ती' स्मशनात एकटीच जळत होती : नात्यांनी पण सोडली साथ : सोमेश्वरनगर परिसरातील एका गावातील घटना
https://lh3.googleusercontent.com/-wNLKg4LCzLo/XxceBqYH32I/AAAAAAAADOQ/YEtwmF-7yicRY0svmLz3AZSB97S7EolOwCLcBGAsYHQ/s1600/1595350439537093-0.png
https://lh3.googleusercontent.com/-wNLKg4LCzLo/XxceBqYH32I/AAAAAAAADOQ/YEtwmF-7yicRY0svmLz3AZSB97S7EolOwCLcBGAsYHQ/s72-c/1595350439537093-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_784.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_784.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy