पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या @ २३०
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता खेडेगावांमध्ये वाढत आहे. आज दुपारी आलेल्या अहवालानुसार ७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३० झाली आहे.
जेजुरी येथून ५२ स्वॅप पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व जेजुरी येथील असून हायरिस्क कॉन्टॅक्ट मधिल आहेत. हिवरे येथील एक, माळशिरस येथील एक व परिंचे येथील एक; असे ३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे खाजगी तपासणी अहवाल आहेत.
अजूनही वेळ गेलेली नाही पुरंदरकरांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. एकाच दिवशी रुग्णांचे मोठे आकडे येत असुन, आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांन सव्वादोनशेचा आकडा पार करत आहे. आता जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टर च्या वतीने करण्यात येत आहे.
COMMENTS