खंडोबाचीवाडी त्या पेशेंटच्या संपर्कातील सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. या पेशेंट च्या संपर्कातील तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
खंडोबाचीवाडी येथील रहवाशी असलेला परंतु भोर याठिकाणी कामाला असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा दि ११ रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले त्याच्या घरातील तिघांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
COMMENTS