श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थानची श्रावणी यात्रा रद्द- विश्वस्त डॉ कुलदीप काकडे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजे येथील ऐतिहासिक सोमेश्वर मंदीराची यात्रा यंदाच्या वर्षी प्रथमच रद्द करणेचा निर्णय विश्वस्त समितीने घेतला आहे. विश्वस्त डॉ कुलदीप काकडे यांना फोन करून सा. सोमेश्वर रिपोर्टर ने माहिती घेतली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याच्या आधारे जिल्ह्यात लागु केलेल्या कायद्यानुसार कोरोना पासून बचावासाठी सोशल डिस्टन्सींग रहावे, संचार बंदीचे काटेकोर पालन व्हावे या हेतुने उपाययोजना म्हणुन देवस्थान समितीने तातडीची बैठक घेतली. या बैठकीत गर्दी टाळण्याच्या हेतूने काही विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान यात्रेनिमित्त यंदा कोणतीही दुकाने चालू राहणार नाहीत. मंदीर प्रवेश देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद राहणार आहे. मात्र परंपरेप्रमाणे विधीवत पुजा अर्चा, सोमवतीचे पालखीचे स्नान, सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन, मास्क वापरुन, सॅनिटायझर व्यवस्थेसह केले जाणार आहे. यावर्षी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सोमवतीची पालखी यंदा निरा स्नानावेळी वाहनातून नेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
महिनाभर विश्वस्तांनी आपली जबाबदारी जबाबदारी चोख पार पाडावी
सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील भाविक गर्दी करत असतात, लोकडाऊन असला तरी कलश दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करणार आहेत. यासाठी विश्वस्तांनी दररोज मंदिरात उपस्थित राहून गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
COMMENTS