पुरंदरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३५६
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील एका दिवसात सर्वात जास्त रुग्ण सापडण्याचा विक्रम आज झाला आहे आज दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल ३१ लोकांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सासवडसह पुरंदर तालुक्यातील रुग्णांची संख्या आता ३५६ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्याने तालुका प्रशासनाला आता चिंता वाटू आहे.
सासवड येथून ११० व जेजुरी येथून ६ असे एकूण ११६ स्वॅप पैकी १११ चे अहवाल प्राप्त झाल्यानंतर. ३० पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. सासवड शहर १८, जेजुरी १, सुपे खु १, सोनोरी २, पिसर्वे २, नारायणपूर १, परिंचे २,भिवडी १, आंबोडी १, ताथेवाडी १, तसेच खाजगी तपासणी अहवाल १ राणमळा येथील व्यक्तीअसे एकूण तालुक्यात शनिवार दि. १८ रोजी दुपारपर्यंत आतापर्यंत ३१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS