पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिडशेच्या उंबरठ्यावर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील आत्तापर्यंतच्या एका दिवसाच्या रुग्णांमध्ये आज सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या समोर येत आहे. आज मंगळवारी सकाळपासून वेगवेगळ्या वेळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या समोर येत होती. दुपारी चार वाजेपर्यंत कोरोनाचे सासवड सह ग्रामीण भागामध्ये २५ रुग्ण आढळले होते. संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा २ रुग्ण ग्रामीण भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता पुरंदरमधील तोरणाचे १४६ पॉझिटिव्ह रुग्ण संख्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
वाघापूर येथील १ व दौडज येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
पुरंदरच्या सासवड सह आता ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. कालपरवापर्यंत सासवड व सासवडच्या परिसरातील खेडेगावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र आज वाघापूर, वाल्हे, दौंडज या ग्रामीण भागातही रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. त्यामुळे पुरंदरकरांनी आता सावध राहिले पाहिजे. बिगेनींग अगेन किंवा अनलॉक टू मध्ये लोकांना मर्यादित वागण्याची सांगण्यात आले होते. मात्र लॉकडॉन उठल्यासारखे लोक सैरावैरा बाजारात व इतर ठिकाणी फिरताहेत आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करत नाहीत. ग्रामपंचायती मार्फत मास्क वापरण्यावर बंधने घालत आहेत, न घातल्यास दंडात्मक कारवाई करतायेत. पण ग्रामपंचायतीचे कर्मचारी दररोज अशी कारवाई करतीलच असे नाही. कारवाई करतेवेळी लोक हुज्जत घालत आहेत. या लोकांचे एक प्रकारे वाईटपणा घेण्याची वेळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर येत आहे. स्थानिक कर्मचारी असल्याने त्यांच्यावर दबाव असतो. त्यामुळे ही कारवाई पुढील काळात होईलच असे नाही. मात्र लोकांनी स्वयंस्फूर्तीने मास्क वापरणे गरजेचे आहे.
COMMENTS