राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते रामभाऊ भगत यांचे निधन
सोमेश्वरनगर ; प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामभाऊ भगत यांचे हृदयविकाने नुकतेच निधन झाले आहे. ते ८५ वर्षाचे होते.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी २७ वर्ष तर व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी १० वर्ष काम पाहिले. सहकारातील जेष्ट नेते म्हणून त्यांची ओळख होती. सहकरमहर्षी कै. मुगुटराव आप्पा काकडे आणि बाबलाल काकडे यांच्या बरोबर सहकारात काम पाहिले. त्यांनी ३० वर्षांपेक्षा अधिक काळ सहकाराची योगदान दिले. नंतर च्या काळात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय होते. गेल्या १५ दिवसापूर्वी भगत बापूंनी सोमेश्वर येथील पत्रकारांशी संवाद साधत सहकारातील बारकावे सांगत सहकार टिकला पाहिजे अशी भूमिका मांडली होती, सा. सोमेश्वर रिपोर्टर ने घेतलेली त्यांची ही मुलाखत अखेरची ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
COMMENTS