सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बौध्द-दलितांच्या बाबत राज्य सरकार असंवेदनशील : पंकज धिवार

बौध्द-दलितांच्या बाबत राज्य सरकार असंवेदनशील : पंकज धिवार

पुरंदर :  प्रतिनिधी

 गेले दोन ते तीन महिन्यात सातत्याने बौद्ध-दलित, पारधी समाजाच्या हत्यांचे सत्र सुरु आहे. त्यातील बरेचसे आरोपी अजुनही मोकाट फिरताहेत. यातील काही आरोपी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामूळे या आरोपींना अटक होत नाही असे उदगार रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी सासवड तहसिल कार्यालया समोरील अंदोलना वेळी काढले.
          केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, राज्य सरकारच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्र भर आंदोलन छेडन्याचा आदेश दिला आहे. सातत्याने होणा-या दलित-बौद्ध हत्याकांडाचे प्रमाण महाआघाडी (ठाकरे) सरकारच्या कालखंडात वाढले आहे. नागपुर येथील केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणारया अरविंद बनसोडची हत्या झाली, पुणे येथील विराज जगतापची हत्या प्रकरण, बीड येथील पारधी बांधवांचे तिहेरी हत्याकांड, भोर येथील बौध्द युवतीची आत्महत्या अशा एक ना अनेक प्रकरणात आरोपींना अटक करण्यास दिरंगाई झालेली आहे. काही प्रकरणातील आरोपी अजुन देखील अटक झालेले नाहीत याचा अर्थ हे सरकार निष्क्रीय व असंवेदनशील आहे.
         भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत पुस्तकासाठी दादर येथील हिंदू कॉलनी त 'राजगृह' नावाचे निवासस्थान बांधले होते. ते समस्त भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. त्या निवासस्थानावर काही अज्ञात समाज कंटकांनी तोडफोड केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेवुन कठोरात कठोर कारवाई व्हावी. त्या संपुर्ण प्रकरनाची सी.आय. डी चौकशी व्हावी. या सर्वच प्रकरणी सरकारने आरोपींना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी. या प्रमुख मागन्यांसाठी व अशा निष्क्रीय सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा दयावा व ठाकरे सरकारचा निषेध अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी पुरंदरचे निवासी नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे, पोलिस प्रतिनिधी कॉन्सटेब्ल बाळासाहेब गोडसे यांना देण्यात आले. यावेळी युवकअध्यक्ष स्वप्निल कांबळे, उपाध्यक्ष अमोल खरात, महिलाध्यक्ष व पिंगोरीच्या माजी सरपंच पल्लवीताई भोसले, प्रतिक धिवार, युवराज धिवार, सौरभ पंडीत, एकनाथ कांबळे, नितेष पवार, स्वप्निल घोड्के, श्रीधर सोनवणे, तुषार रणपिसे, अन्वर शेख असे अनेक कार्यकर्ते सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत मास्क लावुन उपस्थीत होते.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बौध्द-दलितांच्या बाबत राज्य सरकार असंवेदनशील : पंकज धिवार
बौध्द-दलितांच्या बाबत राज्य सरकार असंवेदनशील : पंकज धिवार
https://lh3.googleusercontent.com/-S8RJpE4SaVM/Xwmsh3gDCvI/AAAAAAAAC_M/82mqI8uXoD0HLqi2uVfeVWXFzHX7m-lMQCLcBGAsYHQ/s1600/1594469499632986-0.png
https://lh3.googleusercontent.com/-S8RJpE4SaVM/Xwmsh3gDCvI/AAAAAAAAC_M/82mqI8uXoD0HLqi2uVfeVWXFzHX7m-lMQCLcBGAsYHQ/s72-c/1594469499632986-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_63.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_63.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy