आजची पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २११ वर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड सह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढता वाढतच आहे. आज रविवार दि.१२ रोजी सकाळी एकाच वेळी १६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २११ वर गेली आहे ही संख्या धोकेदायक असल्याचे बोलले जात आहे.
पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातून सासवड येथून एकूण पाठविण्यात आलेल्या ४९ स्वॅप पैकी १६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. सासवड येथील ९ पैकी २ नवीन, तर ७ हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील आहेत. ग्रामीण ७ पैकी- सर्व आयरिस कॉन्टॅक्ट मधील आहेत ४ चार रुग्ण सोनोरी येथील आहेत तर ३ तीन रुग्ण उदाचीवाडी येथील आहेत.
आता पुरंदरकरांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाने तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे. एकाच दिवशी रुग्णांचे मोठे आकडे येत असुन आता खबरदारी घेण्याची गरज आहे. ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच शारीरिक व्याधी असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करत राहावा असे आवाहन पुरंदर तालुका पत्रकार संघ तसेच सोमेश्वर रिपोर्टरचॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.
COMMENTS