पुरंदरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६५ वर : तर २० मृत्यू
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी व इतर गावांमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज पुन्हा खाजगी लॉबमध्ये टेस्ट केलेल्या रिपोर्टचा अहवाल आला असून, त्यामध्ये वेगवेगळ्या गावातील ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६५ झाली आहे, तर मृत्यु २० झाले आहेत.
पुरंदर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार खाजगी चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गराडे येथील १, आंबळे येथील १, सुपे (खु) येथील १, जेजुरी येथील १, पॉझिटिव आल्याने आज सकाळी पुरंदर तालुक्यातील चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे पुरंदर तालुक्यातील कोरूना रुग्णांची संख्या ४६५ झाली आहे.
COMMENTS