पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६१ : तर मृत्यू २०
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदरमधील सासवड, जेजुरी व तक्रारवाडी येथील ४ रुग्णाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून नारायणपूर येथील एक वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६१ झाली आहे, तर कोरोना मृत्यु २० झाले आहेत.
सासवड येथील २४ जुलैचे प्रलंबित १२ स्वॅप पैकी २ पॉझिटिव्ह. एक सासवड, एक सोनोरी.
जेजुरी येथून पाठविलेला एक स्वॅप पॉझिटिव्ह. सदर व्यक्ती जेजुरी येथील आहे. तक्रारवाडी येथील एका व्यक्तीचा खाजगी स्वॅप अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नारायणपूर येथील एका कोरोना रुग्णाचा पुरुष, वय वर्षे ७० मृत्यू झाला आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS