पुरंदरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९७ तर १६ मृत्यू
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यावरील कोरोनाचे ढग आता चांगलेच दाटुन आले आहेत. सासवडसह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या व मृतांची संख्या वाढतच आहे. आज आलेल्या माहितीनुसार आता पुरंदर तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९७ झाली आहे तर १६ रुग्णांचा मृत्यु कोरोना मुळे झाले आहेत.
आज बुधवार दि.२२ रोजी सकाळी आलेल्या माहितीनुसार सासवड शहरातील कोरोना झाल्याने पुणे येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल असलेले एक रुग्ण वय वर्षे ७७ पुरुष मयत झाले आहेत. तर दुपारी दीडच्या सुमारास आलेल्या माहितीनुसार सासवड येथील २ रुग्णांचे खाजगी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी १ महिला वय वर्षे ६६ काल सासवड येथे मयत झाल्या आहेत.
COMMENTS