पुरंदर तहसील कचेरीतील एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ४४७ वर
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवडच्या तहसील कचेरेतीतल एक कर्मचारी पुणे निवासी मागील आठवड्यात कोरोनानेने मृत्यू पावला होता. त्यानंतर तहसील कचेरीतील कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आल्याची धक्कादायक माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे तर आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ५ रुग्ण तालुक्यात पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ४४७ तर मृत्यू १९ झाले आहेत.
सासवड येथून पाठविण्यात आलेल्या ४९ स्वॅपचे अहवाल प्राप्त ५ पॉझिटिव्ह झाले आहेत. सासवड २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळे आहेत पैकी १ तहसील कार्यालयाचे कर्मचारी आहेत. भिवडी येथील १, गुऱ्होळी येथील १, व माळशिरस येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS