निरा बाजारपेठेत गटारीची उलाढाल तब्बल २३ लाख ५० हजार
४ लाखांचे मद्य तर १९ लाख ५० हजारांचा मांसाहार विक्री.
पुरंदर : प्रतिनिधी
कोरोनाल आम्ही भित नाही ! आम्ही शासनाच्या अर्थकरणाचा कणा आहोत, आम्ही आज ऐश करणार असे म्हणत निरा शहरात तब्बल १९ लाख ५० हजारांचे खाद्याचे मंस विक्री झाली तर देशी विदेशी दारुची ४लाख ३ हजार रुपयांची विक्री येथील बाजारपेठेत झाली असून तब्बल २३ लाख ५३ हजारांची उलाढाल नीरा परिसरातील लोकांनी केली आहे.
आजही आषाढ (आखाडा) महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने व पुढील दोन दिवसांत श्रावण महिना सुरू होत असल्याने मांसाहार व मद्याला विशेष मागणी असते त्याच पार्श्वभूमीवर येथील मद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. खबरदारीचा उपाय म्हणून व्यवसायिकांनी सोशल डिस्टंसिंग तंतोतंत पालन केले होते तर येणाऱ्या ग्राहकांच्या तोंडावर मास्क असल्याशिवाय मद्य दिले नाही.
श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी मांसाहारावर ऐथेच ताव निरेकरांनी मारला. निरेमध्ये ३ टन ८०० किलो मांस विक्री झाली असून तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांची खरेदी झाली. त्यामध्ये बकऱ्याचे मटण १ टन म्हणजे ६ लाख रुपयंची खरेदी झाली, चिकन ३ टन म्हणजे ६ लाख रुपयांची खरेदी झाली, गावरान कोंबडी ८०० नग खपले असून ६ लाखांची विक्री झाली आहे, तर अंडी ३० हजार नग खपलेले असून १ लाखा ५० हजारांची खरेदी झाली असून सुमारे १९ लाख ५० हजारांचे मंसाहाराची उलाढाल नीरा बाजारपेठेत झाली आहे.
एरवी मद्यांचा व्यवसायाची उलाढाल दिड लाखाच्या आसपास असते तर रविवारी २ लाखा २५ हजारांची असते. मात्र श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी दरवर्षीच मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारू विक्री होत असते. त्याच प्रमाणे आजही येथील एक वाईन शॉप, दोन देशी दारू व दोन बियर बार मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मात्र सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करत. या सर्वांची ४ लाख ३ हजारा रुपयांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
निरा येथील दोन देशी दारूच्या दुकानातून ३० हजार रुपयांची विक्री झाली, विदेशी मद्यालयाच्या वाईन्स शॉप मध्ये २ लाख २५ हजारांची दारु खपली तर दोन बिअर बार मध्ये १७ हजार रुपयांची दारु खपल्याची माहीती स्थानीक विक्रेत्यांनी दिली. निरा येथे येणारे हे मद्य प्रेमी विशेषता पंचक्रोशीतील ग्रामीण भागातून तसेच सातारा जिल्ह्यातील लोणंद, बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर व पुरंदर तालुक्यातील जेजुरी पासून लोक नीरा येथे मद्य खरेदीसाठी येत असतात.
निरा येथील एकमेव असलेल्या वाईन शॉप मध्ये मद्यपींनाची आवडती दारू (ब्रँड) असते तिचा मागील दोन दिवसांपासून तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे मद्यप्रेमींची थोडी निराशा झाली, मात्र दुसऱ्या ब्रँडेवर समाधान मानत आपली तहान भागवून त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र काही विशिष्ट मद्य मिळत नसल्याने त्यांनी नाराजी ही व्यक्त केली.