बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी ... २३ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी येत आहे आज बारामती टतालुक्यातील २३ जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
पुणे पाठोपाठ बारामती तालुक्यात कोरोना आजाराने डोके वर काढले होते मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष आणि प्रशासनाचे मजबूत काम यावर आता बारामती पुन्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने चालली आहे.
आजच्या दिवसभरात २३ जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने बारामतीकरना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३५ असून यातील २२ जणांना घरी सोडण्यात आले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS