निरा नजिकच्या सातारा हद्दितल एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या नीरा शहरापासून जवळच असलेल्या पिंपरे (बुद्रुक) येथील एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पिंपरे (बुद्रुक) हे नीरा नदीच्या पलिकडील सातारा जिल्ह्यामधील असून या युवकाला सातारा मध्ये दाखल करण्यात आली आहे.
नीरा व सासवड परिसरात हा युवक व्यवसायानिमित्त जात असल्याने त्याला संसर्ग झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बिगेनिंग अगेन अंतर्गत अनलॉक टु सुरू झाल्यानंतर विवाह सोहळे व इतर कार्यक्रमांना पोलीस परवानगी देण्यात आली. त्यामध्ये काही नियम व अटी घालून देण्यात आल्या होत्या. मात्र विवाह समारंभात या नियमांचे व अटींचे तितकेसे गांभीर्याने घेतले जात नाही. विवाह सोहळ्या दरम्यान मास्कचा वापर तर केलाच जात नाही. सॅनिटायझर हे दिखाव्या यापुरते ठेवले जाते. सोशल डिस्टंसिंग सुरुवातीला पाळले जाते मात्र साखरपुडा, हळद व विवाह सोहळा यामध्ये पूर्वीसारखीच गर्दी होत असते. या दरम्यान व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठी भीती असते, तारेवरची कसरत करत ते आपला व्यवसाय सुरक्षितपणे करत असतात. मात्र लोकांना या दरम्यान कोरोनाची कसलीही भीती राहत नसते. हे लोक थेट व्यवसायिकांच्या संपर्कात येतात.
आज मंगळवार दि.७ जुलै रोजी पिंपरी बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निरा सह सासवड परिसरात याची चर्चा होत आहे. कारण हा व्यक्ती व्यवसायानिमित्त निरा व सासवड शहरात तसेच खेडेगावांमध्ये जात असतो. विवाह सोहळ्या दरम्यान त्यांचा व्यवसायमुळे याच परिसरात जास्त वावर असतो. या परिसरातील लोक त्यांना कामे देत असतात. त्यामुळे हा व्यक्ती किती लोकांच्या संपर्कात आला आहे हे शोधणे कठीण होणार आहे. ही व्यक्ती फक्त झोपण्यासाठी पिंपरी (बुद्रुक) येथे जात असते इतर वेळी हे निरा किंवा सासवडच्या ग्रामीण भागात असतात. पुरंदरच्या प्रशासनापुढे हे मोठे आव्हान असणार आहे कारण या व्यक्तीचा कोरोनाची चाचणी सातारा जिल्ह्यात झाली आहे. त्याची नोंदही सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या कार्यक्षेत्रात झाली आहे. मात्र पुरंदरकरांना या विषयी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.
COMMENTS