सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

निरा बसस्थानकातल 'द बर्निंग बस'.

निरा बसस्थानकातल 'द बर्निंग बस'.

पुरंदर : प्रतिनिधी

'द बर्निंग बस' निरा स्थानकात मालवाहतूक एसटी बसला रात्री साडेअकराच्या दरम्यान अचानक आग लागल्याने बसस्थानक परिसरात हाहाकार माजला. काही युवक व नीर पोलीस दुरक्षेत्रातील कर्मचारी यांनी वेळीच अग्निशमन दलाला पाचारण करत मालवाहतूक बस मधील साहित्य काढत बस विझवली.
 मंगळवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान निरा बस स्थानकात एका बस क्र. एम.एच.१४-बी.टी- ०५७६ मधून धूर येत असल्याने युवकांनी आरडाओरडा केला. बसस्थानकाती कोणीही नसल्याने मोठा अनर्थ होणार अशी शंका व्यक्त झाली. बसमध्ये त्यावेळी दोन चालक होते. वाई (जिल्हा सातारा) येथून ही बस बीड येथे सोलर वॉटर हीटर घेऊन निघाली होती. नीरा नदीच्या पुलावर या बसचा टायर पंचर झाल्याने ड्रायव्हरने बस सुरक्षेच्यादृष्टीने नीरा बस स्थानकात आणली. गाडी उभी करताच गाडीच्या मध्यभागात धूर येत असल्याचे युवकांनी त्यांना सांगितले. त्यांनी निरा बसस्थानकातील कंट्रोल रूममध्ये संपर्क केला असता कंट्रोल रूम मध्ये कोणीही उपलब्ध आली नाही किंवा वॉचमेन दिसून आला नाही. युवकांनी शेजारीच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत अग्निशमन दलाला फोन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नीरा येथील जुबिलंट लाईफ सायंन्सेस कंपनीच्या अग्निशमन गाडी काही क्षणात पोहचली.
          या दरम्यान युवकांनी बसमधील सोलर पॅनल बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. निम्मे सोलर पॅनल बाहेर काढले होते. मात्र मध्यभागी आग लागल्याने येथील सोलर पॅनल काढणे अशक्य होते. याचवेळी अग्निशमन दलाची गाडी आली पाण्याचा व फमचा फवारा करत असताना आग कधी विझत होती तर कधी भडकत होती. प्रचंड धूर येत होता त्यामुळे बस मध्ये काही वेगळी तर नाही ना अशी शंका व्यक्त केली. मात्र सोलर टॅंक मधिल थर्माकोल वितळून पेट घेत असल्याने आग वाढत होती. बसच्या काचेच्या आतून पत्र लावल्याने काचा फोडल्या वरही पाणी आत जात नव्हते. अग्नी शमन दलाच्या सचिन कुलकर्णी व सहकार्याने मोठे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आली.
       आग आटोक्यात येईपर्यंत मात्र निम्मे सोलर पॅनल जळून खाक झाले होती. एसटी बस चालक हे या गावातील लोकांचे नातेवाईक असल्याचे पुढे आले त्यामुळे मदत कार्य सहकर्य झाले. दोन तास चाललेल्या या अग्नी तांडवा दरम्यान रात्र पाळीला असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना फोन केल्यावर ही दोन तास येता आले नाही. हा मगरुर कर्मचारी इतर वेळी स्थानकात काही हालचाली दिसल्यास सरकारी मालमत्ता सांभाळण्याची जबाबदारी आहे माझी असे म्हणत असतात. मग आज एवढा अग्नी तांडव होत असताना तो फोन करून ही आला नाही या विषयी युवकांनी संताप व्यक्त केला आहे. या कर्मचाऱ्याचे निलंबन व्हावे अशी मागणी निरेतील युवकांनी केली आहे.
 
  पब्जी प्लेयर्स मुळे मोठा अनर्थ टळला.
  रात्रीच्या वेळी युवक ऑनलाईन पद्धतीने पब्जी खेळ खेळत असतात. काही युवक घरात बसून तर काही युवक रस्त्यावर किंवा मोकळ्या ठिकाणी पब्जी खेळत असतात. बसस्थानक परिसरात पब्जी खेळत असलेल्या युवकांनी ऑनलाईन असलेल्या आपल्या मित्रांना खेळादरम्यान निरा येथे बस स्थानकात एक बस पेटत असल्याचे सांगितले. ही घटना निरासह परिसरातील गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली व लोक व युवक मदत कार्यासाठी धावून आली. अन्यथा फक्त अग्निशमन दलाच्या व पोलिसांच्या बळावर ही आग आटोक्यात येणे अशक्य होते युवकांनी त्या बसमध्ये चढून पाण्याचा फवारा मारला वेगवेगळ्या युक्त्या लढवत बसची आग आटोक्यात आणण्याचा शर्तीचा प्रयत्न केला.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : निरा बसस्थानकातल 'द बर्निंग बस'.
निरा बसस्थानकातल 'द बर्निंग बस'.
https://lh3.googleusercontent.com/-AKmeh47BTTU/XwPn6UW3GWI/AAAAAAAAC70/ySjqB3BNSc4sB543rUTRuwa8qh9bM7dqQCLcBGAsYHQ/s1600/1594091498359681-0.png
https://lh3.googleusercontent.com/-AKmeh47BTTU/XwPn6UW3GWI/AAAAAAAAC70/ySjqB3BNSc4sB543rUTRuwa8qh9bM7dqQCLcBGAsYHQ/s72-c/1594091498359681-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_81.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_81.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy