राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाकडून सुपा मोरगाव रस्त्यावर ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाकडून सुपा मोरगाव रस्त्यावर ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोरगांव :  प्रतिनिधी
 
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २  यांनी बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी गावच्या हद्दीत सुपा- मोरगाव रस्त्यावर असलेल्या रंगीला राजस्थान ढाबा येथे अतिशुद्ध मद्यार्क  ( स्पिरिट ) साठा  मुद्देमाल जप्त केला आहे.  सुमारे ६२  लाखाहून अधिक किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २  पुणे यांना खात्रीलायक गोपनीय बातमी मिळाल्यानंतर सुपे  - मोरगाव रोड वरील भोंडवेवाडी ता. बारामती ,  जि. पुणे येथिल रंगीला राजस्थान ढाबा येथे ढाब्याच्या  आवारात टॅंकर लावून वाहन चालक       सुखनाम दिलज्योत  सिंग वय वर्ष ५६ रा. कोटदाणा ता.जि . तरणतारण  या इसमाने सदर ढाब्यावर   वाहन लावून प्लास्टिक पाइपच्या साह्याने टँकरमधून अतिशुद्ध मद्यार्क  चोरी करून आरोपी  पुखराज टीकमजी भार्गव  ( ढाबा  चालक ) वय वर्षे ४२  रा . कुतवळवस्ती रंगीला राजस्थान ढाबा  ,सुपा मोरगाव रोड , ता. बारामती, जि. पुणे  मूळ पत्ता मु. पो. कोठडी  , तालुका दिसोरी , जिल्हा पाली ,राजस्थान  यांना विक्री करणार असल्याचे समजले होते .
सदर ठिकाणी छापा घातला असता स्पिरिटची अवैधरित्या चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. सदर दोन्ही आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५  ( क , ड  ) ८१/८३ व १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे .सदर गुन्ह्यातील आरोपी कडून अशोक लेलँड कंपनीचा सोळा चाकी टॅंकर वाहन क्रमांक एम.पी . ०९ ए . जे . ०२७७  या वाहनासह अंदाजे चाळीस हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क (स्पिरिट )  प्लास्टिक  पाईप असा एकूण ६२ लाख ७ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . लॉकडाऊन काळात सर्वात मोठी कारवाई करण्यास पुणे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला यश आले आहे .सदर कार्यवाही प्रसाद सुर्वे विभागीय भरारी उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग  , संतोष झगडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे  , संजय  जाधव , संजय पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बिराजदार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पुणे  ,विजय मनाळे  निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड विभाग , विकास थोरात दुय्यम निरीक्षक सतीश इंगळे दुय्यम निरीक्षक , प्रशांत दहींजे ,   नवनाथ पडवळ, बि. आर सावंत , विजय विंचुरकर , अशोक पाटील  , महिला जवान मनिषा भोसले , जवान केशव वामणे , अभिजीत सिसोलेकर  यांनी कार्यवाही केली . पुढील तपास विकास थोरात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पुणे हे करीत आहे.
To Top