जेजुरीच्या खंडेरायाला कऱ्हा नदीच्या पाण्याने जलाभिषेक : अमावास्या साध्या पद्धतीने संपन्न
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्या ही एक जेजुरी करांसाठी पर्वणी असते. यावेळी महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून खंडेरायाचे भक्त दर्शनासाठी जेजुरी येत असतात. मात्र अमावस्या निमित्त असणारे सर्व धार्मिक विधी रद्द करण्यात आल्याचे देव संस्थांनी जाहीर केले होते. त्यामुळे आज जेजुरीत कोणीही फिरकले नाही. मात्र देव संस्थांनी व नित्ये पुजारी यांनी खंडेरायाला कर्हेच्या पाण्याने स्नान व दुग्धाभिषेक करून अभिषेक घालण्यात आला व परंपरेप्रमाणे अमावस्या मोजक्या लोकांमध्ये व कमी वेळेत साजरी केली.
जेजुरीगडावर आज सोमवती अमावस्या निम्मित पूजा व अभिषेक करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवती यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र देवाच्या गाभाऱ्याची सजावट आणि त्रिकाल पूजा महाभिषेक करण्यात आला या वेळी देवस्थानचे मोजके कर्मचारी आणि पुजारी उपस्थित होते. तर जेजुरीतील ग्रामस्थ आणि भाविकांना परणावगी नाकारण्यात आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने बंद करण्यात आली आहेत. कोरोना संसर्ग वाढत असतानाने शासनाने निर्बंध लादण्या आधीच सर्वात पहिले जेजुरी देवस्थांनच्या विश्वस्तांनी देऊळ बंद चा निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाला सहकार्य केले होते. त्यामुळे राज्यभर देव संस्थांचे कौतुक झाले. राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या जेजुरीमध्ये मोठी असते. आज सोमवती अमावस्या यानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करत असतात त्यामुळे आज सोमवती अमावस्या रद्द करण्यात आल्याची या आधीच प्रसिद्धीस दिले होते.
गणेश आगलावे, पुजारी
खंडेरायाच्या गाभाऱ्याला फुलांची आरास करून कर्हेच्या पाण्याने व दुग्धाभिषेक घालून विधीवत पूजा केली. मोजके पुजारी व देवसंस्थानचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत जलाभिषेक घालण्यात आला.
COMMENTS