वाणेवाडी येथील ३४ वर्षीय महिला पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील एका ३४ वर्षीय महिलेसह तालुक्यातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल घेतलेल्या नमुने पैकी उर्वरित १७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरातील २ व ग्रामीण जगातील ३ असे पाच रुग्ण पॉझिटिव आलेले असून १२ जणांचा अहवाल निगेटिव आलेला आहे बारामती शहरातील आमराई परिसरातील ५९ वयाची महिला व पंचवीस वर्षाचा तिचा मुलगा पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच मेखळी येथील साठ वर्षे वयाच्या पुरुष व कांबळेश्वर येतील २९ वर्षे वयाचा तरुण व वानेवाडी येथील ३४ वर्षांची महिला पॉझिटिव आलेली आहे. अशी माहिती बारामती तालुका अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
COMMENTS