वाणेवाडीकरांना दिलासादायक बातमी : ती महिला हडपसरची, पत्ता मात्र वाणेवाडीचा
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी सह मेखळी, कांबळेश्वर आणि बारामती येथील असे पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र वाणेवाडी येथील ३४ वर्षीय महिला ही हडपसर या ठिकाणी रहावशी असून फक्त पत्ता वाणेवाडीचा दिला आहे. त्यामुळे वाणेवाडी करांना दिलासा मिळाला आहे. त्याच बरोबर कांबळेश्वर येथील देखील २९ वर्षीय युवक पिंपरी (मोशी) या ठिकाणी असून त्याचा देखील कांबळेश्वर येथे जास्त संपर्क आला नसल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल घेतलेल्या नमुने पैकी उर्वरित १७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरातील २ व ग्रामीण जगातील ३ असे पाच रुग्ण पॉझिटिव आलेले असून १२ जणांचा अहवाल निगेटिव आलेला आहे बारामती शहरातील आमराई परिसरातील ५९ वयाची महिला व पंचवीस वर्षाचा तिचा मुलगा पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच मेखळी येथील साठ वर्षे वयाच्या पुरुष व कांबळेश्वर येतील २९ वर्षे वयाचा तरुण व वानेवाडी येथील ३४ वर्षांची महिला पॉझिटिव आलेली आहे
COMMENTS