पुरंदरमध्ये कोरोनाचा १३ वा बळी : एकूण रुग्ण संख्या ३५७
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या शनिवार पर्यंत वाढत होती. मात्र रविवारी शासकीय सुट्टी असल्याने कोणताही अहवाल कोरोना संदर्भात आला नाही. त्यामुळे पुरंदरकरांनी कोरोना बाबतीत थोडा श्वास सोडला होता. मात्र सोमवारी सकाळी दिवे येथील एक व्यक्ती कोरोना मुळे मृत्यू झाल्याची बातमी आली आणि पुरंदरकरांचा काळजाचा ठोका चुकला आता पुरंदर मध्ये कोरोनाचे ३५७ रुग्ण असून कोरोना मृत्यूची संख्या १३ झाली आहे.
दिवे येथील एक व्यक्ती ११ तारखेपासून प्रथम सासवड येथे व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. ते आज सोमवारी पुणे येथे मयत झालेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
काल रविवार दिवसभरात कोरोना संदर्भात कुठलीच बातमी आली नाही. त्यामुळे पुरंदर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळत नाहीत असे लोकांची समजूत झाली. त्यामुळे लोकांनी थोडा निश्वास सोडला होता. मात्र सोमवारी काही मोठे आकडे येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. याबाबत उलटसुलट चर्चा पुरंदर तालुक्यात रविवारी दिवसभर सुरू होती. आज सोमवारी सकाळीच दिवे येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे आता पुरंदरकर मोठ्या काळजीत पडले आहेत.
COMMENTS