मगरवाडी येथील नानासाहेब कोंढाळकर यांचे निधन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मगरवाडी ता बारामती (कोंढाळकरवस्ती) येथील प्रगतशील बागायतदार नानासाहेब दशरथ कोंढाळकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षाचे होते.
मुंबईत याठिकाणी ते बीएसएनएलमध्ये मध्ये सेवेत होते. कोंढाळकरवस्तीच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. आयुष्याची पुंजी शेतीत लावून जिराईत शेती बागायत करता येते असा मार्ग त्यांनी अनेकांना दाखविला. परिसरातील पहिला वैयक्तिक लँडलाईन फोन त्यांच्या घरी बसला होता. मगरवाडीचे माजी सरपंच संतोष कोंढाळकर यांचे ते बंधू होत तर स्थापत्य अभियंता रोहिणेश कोंढाळकर याचे ते वडील होत.
COMMENTS