पुरंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३६९ वर, तर सासवड मध्ये २२१ रुग्ण
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील मुख्यालय असलेले सासवड मधील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही. प्रशासनाने वेगवेगळे उपायोजना करत कडक निर्बंध आणले असतानाही शनिवारी पाठवलेले टेस्ट रिपोर्ट आज सोमवार दि .२० रोजी १२ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता सासवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २२१ झाली आहे, तर पुरंदर मध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे. कोरोना मृत्यु १३ झाले आहेत.
सासवड येथून शनिवारी पाठविण्यात आलेल्या ८६ स्वॅप पैकी ८५ चे अहवाल प्राप्त. ११ पॉझिटिव्ह आले आहेत तर कोळविहिरे येथील १ व्यक्तीचा खाजगी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सोमवारी दुपारपर्यंत १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS