पुरंदरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८० वर, तर सासवडमध्ये २२७
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड सह ग्रामीण भागातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील आठवड्यात दिवसातून एकदा कोरोना रिपोर्टचा अहवाल येत होता. आता दिवसातून दोन ते तीन वेळा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल येऊ लागले आहेत. आज दिवसभरात दोन वेळा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल आले. आत्ताच संध्याकाळी पाच वाजता आलेल्या अहवालानुसार सासवड सह तालुक्यातील ११ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता सासवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२७ तर पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८० झाली आहे. तर कोरोनाचे मृत्यु १३ झाले आहेत.
सासवड येथील ११ पैकी १० अहवाल तालुक्यातील आहेत. ५ सासवड शहरातील, ५ ग्रामीण (कुंभारवळण १, पिसर्वे १, गुरहोळी १, कोंडीत २) तसेच सासवड शहरातील १ खाजगी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
COMMENTS