सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

सासवड नगरपरिषदेचा महत्त्वपुर्ण निर्णय :कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी उपाययोजना

सासवड नगरपरिषदेचा महत्त्वपुर्ण निर्णय :
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी उपाययोजना

पुरंदर : प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एका एका दिवसात दहा ते बारा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतात. शुक्रवार दिनांक ३ जुलै रोजी पर्यंत सासवड मध्ये कोरणा चे तब्बल ६९ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे नगरपरिषद हद्दीतील लोकांनी सासवड शहर संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी दिवसभरात जोर धरत होती. मात्र जिल्हा व तालुका प्रशासन याबाबत गांभीर्याने निर्णय घेताना दिसत नव्हती. मागील आठवड्यात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद जळक यांनी नगरसेवक व आमदारांना विचारात घेऊन चार दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्याला सासवडकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. मात्र जिल्हा व तालुका प्रशासनाने असा लॉकडाऊन करता येणार नाही असे सांगत तो लॉकडाऊन शिथितील केला. मात्र त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली.
     आज शुक्रवारी सकाळी वेगवेगळ्या प्रभागातील  एकाच वेळी आठ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण लॉकडाऊन व्हावे अशी चर्चा केली. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याने सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी सर्वसमावेशक निर्णय घेऊन सासवड शहर संपूर्ण लॉकडाऊन कसे करता येईल यासंदर्भात विस्ताराने चर्चा केली.  सासवड शहरात यापूर्वी लोकांनी मस्त घालावा सनी टायगर चा वापर करावा सोशल डिस्टंसिंग चे तंतोतंत पालन करावे असे वारंवार दवंडी देऊनही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. सकाळ ८२ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली; तरीही लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतात असे आढळून आले आहे. पुढील काळात असे दिसल्यास दंडात्मक कारवाई करावी लागेल असे सांगण्यात आले.
      सासवड शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जाणवू लागले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सासवड शहर शुक्रवारी ३ जुलै रोजी संध्याकाळी ९ वाजल्यापासून पुढील आठ दिवस म्हणजेच पुढील शनिवारी ११ जुलै रोजी पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा अंतर्गत मेडिकल दुकाने, दवाखाने व टेस्टिंग लॅब पूर्णवेळ चालू राहतील तर दूध व्यवसाय फक्त सकाळी ६ ते ९ या वेळेतच चालू राहील. इतर भाजीपाला, किराणामाल व कृषी दुकाने होम डिलिव्हरी पद्धतीने स्वंयमसेवकांन मार्फत चालू राहतील. पुणे किंवा सासवड शहराबाहेर इतर ठिकाणी नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी त्यांची चाचणी नियमीत करावी व त्यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट नगरपालिकेत सादर करावा. त्यानंतरच त्यांना बाहेर जाण्यास मुभा देण्यात येईल; असे सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सूचना पत्राद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

    सासवड शहरात मागील लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानात घातक पदार्थ विक्री झाली होती. मागील आठवड्याच्या जनता कर्फ्यू दरम्यान ही असेच चित्र होते. मेडिकल स्टोअर्स मध्ये डिटर्जंट पावडर, कपड्यांचे, अंगाचे व भांडी घासायचे साबन, बेकरी पदार्थ सर्रास विक्रीस ठेवले होते. दुग्धजन्य पदार्थांची विक्री असलेल्या दुकानातून सर्रा किराणा मालाच्या वस्तु व बेकरी पदार्थ विक्री केली जात होती. मेडिकल व दुग्धालया शेजारी काही टुकार युवक प्लॅस्टिक कॅरी बॅग मध्ये घातक मावा विक्री करताना दिसून आले होते. अगदी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालया समोरच्या रस्त्यावरही हे युवक चढल्या दराने घातक मावा विक्री करताना एक स्थानीक महिला पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले होते. लॉकडाऊन कडक करावा मात्र असे घातक पदार्थ विक्री करणे धोकादायक असल्याचे लोक दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7036,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : सासवड नगरपरिषदेचा महत्त्वपुर्ण निर्णय :कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी उपाययोजना
सासवड नगरपरिषदेचा महत्त्वपुर्ण निर्णय :कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी उपाययोजना
https://lh3.googleusercontent.com/-KsDjNuHJPm4/Xv9DyaokbsI/AAAAAAAAC4k/cQOn10Se55QUG9MUtZlARfHt4uq6NT00gCLcBGAsYHQ/s1600/1593787304847030-0.png
https://lh3.googleusercontent.com/-KsDjNuHJPm4/Xv9DyaokbsI/AAAAAAAAC4k/cQOn10Se55QUG9MUtZlARfHt4uq6NT00gCLcBGAsYHQ/s72-c/1593787304847030-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_94.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_94.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy