संजय गांधी निराधार योजनेची १३० प्रकरणे मंजूर

Pune Reporter

संजय गांधी निराधार योजनेची130

प्रकरणे मंजूर


बारामतीदि. १७ :-  


१५ ऑगस्ट २०२० स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवड सभा आज तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवनबारामती येथे तहसिलदार विजय पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार महादेव भोसले , शासकीय सदस्य व कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडली.

सभेमध्ये एकूण  १३३ अर्जाची छाननी करण्यात आली.  यामध्ये संजय गांधी योजनेचे६५प्राप्त अर्जापैकी  ६४मंजूर तर०१अर्ज नामंजूरकरण्यात आले.  श्रावणबाळ योजनेचे ५७  प्राप्त अर्जापैकी  ५५  मंजूर तर  ०२   अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे ०८ प्राप्त अर्जापैकी ०८ अर्ज मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय कुटूंब योजनेचे ०३ प्राप्त अर्जापैकी ०३ अर्ज मंजूर करण्यात आले.

To Top