सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

सैनिक महिला बचत गट बनले हायटेक : ऑनलाईन मिटींग घेऊन पार पडली वार्षिक सभा

सैनिक महिला बचत गट बनले हायटेक : ऑनलाईन मिटींग घेऊन पार पडली वार्षिक सभा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

येथे बचत गटाचे हप्ते ऑनलाईन बॅंकींग द्वारे भरले जातात. ऱक्कम पोहोचतात सर्वाना मेसेज दिला जातो. बचत गटात किती रक्कम शिल्लक आहे हे व्हाट्स ॲप गृप वर सर्वाना पाहता येते . सर्वांच्या मागणीनुसार कर्जफेड केली जाते .सर्व व्यवहार ऑनलाईन होत असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " ऑनलाईन मिटींग " द्वारे वार्षिक लेखा जोखा मांडुन एक आदर्श बचत गटाचे उदाहरण दिले आहे .
         करंजेपुल येथील आजी माजी सैनिक स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा अमरजा आळंदीकर यांना बचत गटाचा वार्षीक आढावा व महिलाना हिशेब  व आपण केलेले वर्षभरातील कामकाज सांगायचे होते त्यानी सचीव वृषाली विकास गायकवाड यांच्यापुढे विचार मांडला आणी सुरु झाली ऑनलाईन बैठकीची तयारी .झुम वर ऑनलाईन बैठक घ्यायची ठरली त्याप्रमाणे आळंदीकर यानी लिंक व पासवर्ड तयार करुन पाठवला मात्र अनेक महिलाना अडचणी व शंका  येवु लागल्या . मग त्वरीत गुगल मेट वर जावुन त्यानी लिंक करुन सर्व महिलाना पाठवली बचत गटातील ८० टक्के महिला सहभागी झाल्या व ऑनलाईन मिटींग सुरु झाली.अध्यक्षा सौ अमरजा आळंदीकर यानी लेखा जोखा मांडला व कोरोनाच्या पार्श्वभूमी वर एकत्र येणे धोक्याचे असुन आपण सर्वच व्यवहार जसे हप्ता भरणे ,पैसे खात्यावर हस्तांतरीत करणे असे करु शकतो तर मिटींग का नाही म्हणुन ऑनलाईन मिटींग घेतल्याचे सांगीतले .सुमारे  सहा  लाखाचे वाटप असुन महिना दोन हजार रक्कम भरली जाते . बचत गट सदस्या  कल्पना रिठे यानी  कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आपला वह्या पुस्तकाचा व्यवसाय बंद होता किराणा सारखा व्यवसाय कधी बंद पडणार नाही म्हणुन आपण बचत गटाचे एक लाख कर्ज काढुन व्यवसाय सुरु केला खऱ्या अर्थाने संकटकाळी हा गट उपयोगी पडला असे मत व्यक्त केले .
        अमरजा आळंदीकर यानी आपल्या बचत गटाच्या वाटचालीत सर्व बचत गटांच्या  समन्वय समिती सदस्य अनिल शिंदे ,बाळासाहेब शेंडकर ,गणेश आळंदीकर व जगन्नाथ लकडे आदींची मदत होत असल्याचे सांगीतले .वर्षा शिंदे ,रेश्मा श्रीकांत शेंडकर यानी ही बचत गटाच्या खर्चाचा आढावा घेतला.
         कोरोनामुळे जरी अनेक संकट उभी राहीली असली तरी  काही सकारात्मक बाबी घडु लागल्या आहेत त्यापैकी च महिला सक्षमीकरणाकडे जात असल्याचे चित्र या ऑनलाईन मिटींग ने दिसुन आले .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7036,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : सैनिक महिला बचत गट बनले हायटेक : ऑनलाईन मिटींग घेऊन पार पडली वार्षिक सभा
सैनिक महिला बचत गट बनले हायटेक : ऑनलाईन मिटींग घेऊन पार पडली वार्षिक सभा
https://lh3.googleusercontent.com/-km2Batw-nZM/XzpPRkTNKsI/AAAAAAAAD78/e2GSdF40V4YW8TL6GQWwjCsSmN8qdVquACLcBGAsYHQ/s1600/1597656868265056-0.png
https://lh3.googleusercontent.com/-km2Batw-nZM/XzpPRkTNKsI/AAAAAAAAD78/e2GSdF40V4YW8TL6GQWwjCsSmN8qdVquACLcBGAsYHQ/s72-c/1597656868265056-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_44.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_44.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy