पुणे शहरात वाहतुक शाखेकडून 49 बेवारस वाहनांचा लिलाव

Pune Reporter

पुणे शहरात वाहतुक शाखेकडून 49 बेवारस वाहनांचा लिलाव     

पुणे दि.19 : -  

पुणे शहरात वाहतुक विभागात माहे नोव्हेंबर 2017 पासून बेवारस / बिनधनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशी 49 वाहने ही पोलीस उपआयुक्त्‍ कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत.  ही वाहने ओळखून घेऊन जाण्याकरीता वृत्तपत्रात प्रसिध्दी करुन तसेच या वाहनांच्या मालकांचा शोध घेऊनही मालक मिळून आलेले नाहीत. तसेच या वाहनांची स्थिती ही खुप दिवस पडून असल्याने गंजलेली व खराब झालेली आहे.

                      या वाहनांची कायदेशीर बाबींची पुर्तता करुन लिलावाची मंजुरी मिळालेली असून या वाहनांचा लिलाव दिनांक 25ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 .00  वाजता पोलीस उप आयुक्त्‍ कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथील आवारात करण्यात येणार असल्याचे येरवडा वाहतुक विभागपुणे शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.पडसळकर यांनी कळविले आहे.

To Top