गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबवावा : सपोनी सोमनाथ लांडे
सुपे : प्रतिनिधी
दीपक जाधव
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातुन एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवुन प्रत्येक गणेश मंडळांनी कोरोना काळात प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
सुपे येथील पोलिस स्टेशनच्या आवारात गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत लांडे बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी तंटामुक्त अध्यक्ष अनिल हिरवे होते.
यावेळी या पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे ६२ गावे आहेत. यातील काही गावातुन कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ती गावे कंटेंमेंट झोन म्हणुन घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे अशा गावातुन गणेशाची स्थापना मंडळांनी करु नये. तर इतर गावातील मंडळांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत ' एक गाव एक गणपती ' ची स्थापना करावी असे आवाहन सपोनी सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यास स्मार्ट पोलिस ठाणे म्हणुन गौरविण्यात आले आहे. त्यामुळे सपोनी सोमनाथ लांडे यांचा सत्कार पोलिस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष राहुल बोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नव्याने दाखल झालेले पोलिस उपनिरिक्षक मुंडे यांना सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व गावचे पोलिस पाटील, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
...........................................
COMMENTS