खंडाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुध एल्गार आंदोलन
लोणंद : प्रतिनिधी
मंगेश माने
आज दि १ रोजी संपूर्ण खंडाळा तालुक्यात भारतीय जनता पार्टी खंडाळा तसेच इतर मित्र पक्ष यांच्या यांच्या वतीने दुध एल्गार आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी खंडाळा व इतर मित्र पक्ष यांचा या अंदोलनामागे दुध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ मिळाली पाहिजे, दुधाला १० रूपये अनुदान मिळाले पाहिजे, दुध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजे, दुध पावडरला ५० रूपये अनुदान मिळाले पाहिजे,हा उद्देश होता.*या वेळी भारतीय जनता पार्टीचे देवीदास चव्हाण शेतकर्याच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
हे आंदोलन भारतीय जनता पार्टी यांचे सर्व बुथ प्रमुख, सर्व शक्ती केंद्र, सर्व आघाड्यांचे आजी-माजी पदाधिकारी,नेते,भाजप महिला पदाधिकारी,कार्यकर्त्या, भाजप चे तसेच मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी ठिकठिकाणी दुध एल्गार आंदोलने केली.
COMMENTS