पत्रकार नगरसेवक अजय माळवे तिसऱ्यांदा कोरोना योद्धा म्हणून सन्मानित
लोणंद : प्रतिनिधी
मंगेश माने
फलटण नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक आणि पत्रकार अजयजी माळवे यांना फलटण तालुका ग्रामिण पत्रकार संघाच्या वतीने "कोविङ योद्धा " पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोविड योद्धा पुरस्कार मिळण्याची त्यांची हॕट्रीक झाली आहे .
कोविड 19 प्रादूर्भावाच्या कालावधीमधे वार्डामधे अन्नछत्र , किराणा माल , भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन स्वतः केलेल्या जंतूनाशक फवारणी, समुपदेशन , कोरोना बाबतची जनजागृती अश्या अनेक सामाजिक कार्यांची दखल घेऊन "फलटण तालुका ग्रामिण पत्रकार संघ" यांच्या वतीने आज प्रमाणपत्र देऊन आणि यथोचित सत्कार करुन नगरसेवक अजय माळवे यांचा "कोविड योद्धा" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे विभागिय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार , जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, तालुकाध्यक्ष दिपकराव मदने, उपाध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, सचिव रोहन झांजुर्णे, अशोकराव सस्ते, चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी देखील फलटण येथील प्रख्यात केबी एक्स्पोर्ट कंपनी तसेच सत्यमेव जयते ट्रस्ट इंङिया यांच्या वतीने देखील प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्ध्या म्हणून गौरविण्यात आले आहे.
COMMENTS