दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विवेकानंद अभ्यासिकेकडून सत्कार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालामध्ये सोमेश्वर पंचक्रोशीतून 90% टक्क्यापेक्षा जास्त मार्क पडलेल्या मुलांचा त्यांच्या अभ्यासिकेच्या मार्फत सत्कार सभारंभ पार पडला... कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मु.सा काकडे महाविद्यालयाचे प्रा. दरेकर सर व प्रमुख उपस्थिती म्हणून नुकत्याच PSI म्हणून निवड झालेल्या वनिता पिसे मॅडम ह्या होत्या.. या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांनचा सत्कार करण्यात आला. या मध्ये वाणेवाडी शाळेमधून मधून प्रथम आलेली वरुणा भुरसे 96.40 % द्वितीय आलेला प्रणव सावंत 95.20 % तसेच सोमेश्वर शाळेतून प्रथम कृष्णा सोळस्कर 94.20, द्वितीय विनया मराठे 93.08 % तसेच वाणेवाडी,मुरूम आणि सोमेश्वरनगर शाळांमधील मधील रोहन चव्हाण 93.40%, गायत्री मोरे 93.60%,
अथर्व निंबाळकर 90.80%, अभिजित सर्जे 89.60%, निखिल निर्मल 87.49%,शंतनू भोसले 86.20% माऊली फाफळ 85.20%, पवन गायकवाड, प्रसाद साळुंखे, तेजस्विनी काकडे या सर्व मुलांचा सत्कार करण्यात आला. मुलांना करियर निवडी साठी आणि भविष्याच्या करियर वाटा संदर्भात प्रा. दरेकर सर व गणेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. आणि वनिता पिसे यांनी psi ची निवड झालेली आपल्या संघर्षाची कहाणी आणि अनुभव कथन सांगून मुलांना प्रेरणा दिली आणि मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सावंत यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार नितीन ननावरे यांनी मानले.
COMMENTS