दिलासादायक बातमी 'त्या' पॉझिटिव्ह पेशेंटचा पत्ता वाघळवाडीचा : वास्तव्य अंजनगावला
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज बारामती तालुक्यात २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात वाघळवाडी येथील एका पेशेंट चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र या पेशेंट चा फक्त पत्ता वाघळवाडीचा असून हे पेसेंट सोमेश्वरनगर - वाघळवाडी येथे वास्तव्यास नसून हे पेशेंट बारामती तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी व्यास्तव्यास असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
त्यामुळे वाघळवाडीकरांना दिलासा मिळाला आहे. एक महिन्यांपूर्वी असेल वाणेवाडी या ठिकाणी देखील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, मात्र प्रत्येक्षात तो पेशेंट पुणे या ठिकाणी वास्तव्यास होते.
COMMENTS