वाघळवाडी येथील एका जणाचा अहवाल पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या 438 वर
सोमेश्वरनगर ; प्रतिनिधी
काल बारामती मध्ये एकूण 88 नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 35 जणांचा अहवाल निगेटिव आलेला असून 53 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच खाजगी प्रयोगशाळेमध्ये बारामती मध्ये 44 नमुने अॅंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 24 जणांचा अहवाल निगेटिव आला असून बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील 6 असे वीस जणांची एंटीजेन टेस्ट पॉझिटिव आलेली आहे त्यामुळे बारामतीतील रुग्णसंख्या 438 झाली आहे
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील बुरुडगल्ली येथील चार ,संघवीनगर येथील दोन, कुंभार गल्ली कसबा येथील दोन, साठे नगर कसबा येथील दोन, जळोची येथील एक,अशोकनगर येथील एक, मार्केट यार्ड रोड अमराई येथील एक व शहरातील एक असे 14 जण व पारवडी येथील एक, पाहुणेवाडी येथील एक, काटेवाडी घुले वस्ती येथील एक, माळेगाव येथील एक, वाघळवाडी येथील एक व कटफळ येथील एक असे ग्रामीण भागातील 6 असे एकूण 20 जणांची अॅन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे
COMMENTS