शेवटच्या श्रावणी सोमवारी मोजक्या लोकांच्यात देव खोमणेंच्या भेटीला : खोमणे परिवाराने राखला शेलापागोटेचा मान
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे आज चौथ्या सोमवारी मुख्य शिवलिंगावर विविध रंगबेरंगी फुलांनी सजावट करुन महाअभिषेक पाच पुजा-यांच्या उपस्थितीत पहाटे महाआरती करण्यात आली.
श्रावण मासातील आज शेवटचा म्हणजेच चौथा सोमवार आहे कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे सोमेश्वर मंदिर बंद ठेवण्यात आले होते त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच श्रावण मासात सोमेश्वर परिसर भाविकभक्तांविना ओस पडला होता दरवर्षी श्रावण महिन्यांत लाखोंच्या संख्येने भाविक सोमेश्वरला हजेरी लावतात मात्र यंदा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते मात्र श्रावण मासातील सर्व पुजा परंपरेनुसार पाच लोकांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे त्यानुसार आज चौथ्या सोमवारी पहाटे शिवलिंगाची पुजा करुन विविध रंगांच्या फुलांनी सजविण्यात आले होते.
तसेच आज चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी देवाची वाजत गाजत पालखी सोहळा केला जातो. हा सोहळा देखील मोजक्या लोकांच्यात पार पडला तसेच आज देव खोमणे यांच्या भेटीला जात असतात, तसेच शेलापागोटाचा मान दर वर्षी जळगाव, कोऱ्हाळे बु!! आणि कोऱ्हाळे खु!! या गावातील खोमणे भावकीला असतो मात्र कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी तिन्ही गावातील फक्त ६ जणांच्यात हा खोमणे भेटीला कार्यक्रम पार पडला.
सोमेश्वर देवस्थान चे अध्यक्ष विनोद भांडवलकर, सचिव सुनील भांडवलकर विश्वस्त adv गणेश आळंदीकर यांनी दिवसभर देवाचे विधिवत कार्यक्रम पार पाडले.
पोलिसांची आज ही दमछाक---
आज चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने आज सकाळ पासूनच मंदिराकडे भाविकांची वर्दळ सुरू झाली, मंदिर बंद असले तरी भाविक कळसाचे दर्शन घेत होते. मात्र १० नंतर जास्त गर्दी वाढू लागल्याने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी सोमेश्वर मंदिराकडे जाणारा रास्तच बंद केल्याने अनेक भाविकांना कलश दर्शन ही घेता आले नाही. मंदिर बंद काळातही १० ते १५ हजार भाविकांनी कळस दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
COMMENTS